अनेक जण सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. याच क्रेझचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल, या हेतूने एका सामाजिक संस्थेने 'सेल्फी विथ काऊ' ही स्पर्धा आयोजित केली आहे. वैज्ञानिक आणि सामाजिकदृष्ट्या गोरक्षण आणि गायीचे महत्व या बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. गो सेवा परिवार या सामाजिक संस्थेने 'सेल्फी विथ काऊ' आणि 'काऊफी' या स्पर्धेचे आयोजन केले आहे. गोरक्षण हा मुद्दा धर्म आणि राजकारणाशी जोडता कामा नये. गोमूत्र, दूध आणि शेण आदींपासून वैज्ञनिक सिद्धता दर्शवणारे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत, असे संस्थने सांगितले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews